जनशिक्षण संस्था सिंधुदुर्गच्यावतीने मडुरा हायस्कुलच्या मुलींना सायकल वाटप…

*💫बांदा दि.१९-:* जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून मुलींच्या शैक्षणिक वाटचालीत मदत करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कुल मडुरा ता. सावंतवाडी या प्रशालेतील दहा गरजू दहा विध्यार्थिनींना घर ते शाळा प्रवास करण्यासाठी मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक, शालेय समिती सदस्य, पंचक्रोशीतील सरपंच, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, लाभार्थ्यांचे पालक यांच्या उपस्थितीत शासनाच्या कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून दहा विध्यार्थिनींना वाटप करण्यात आल्या. यामुळे विध्यार्थिनींची वाहतुकीची सोय होणार आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार मुख्याध्यापक एस. ए. गवस यांनी केले. तसेच जनशिक्षण संस्था सिंधुदुर्गच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

You cannot copy content of this page