खारेपाटण चेक पोस्टवर पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिली भेट…

*💫कणकवली दि.१९-:* सिंधुदूर्ग जिल्ह्याची इन्ट्री पॉईंट खारेपाटण चेक नाक्यावर रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. चेकपोस्टवरील आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणेशी संवाद साधत सद्यस्थितीत असणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पथकाकडील रजिस्टरची पाहणी करून जिल्ह्यात येणाऱ्यांच्या तपासणीबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. पालकमंत्री यांनी खारेपाटण चेकपोस्ट येथील आरोग्य विभागाला सक्त सूचना केल्या की, जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड, अँटीजन टेस्ट करा. जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. त्यानुसार, खारेपाटण चेकपोस्टवर १६ एप्रिलपासून आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सायंकाळी खारेपाटण चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली.

You cannot copy content of this page