कोरोनाच्या दोन्ही लस सुरक्षित…

निसंकोच लस घ्या:परिमल नाईक यांचे आवाहन

*💫सावंतवाडी दि.१९-:* भारतात उपलब्ध असलेल्या दोन्ही लस ह्या पूर्णपणे सुरक्षित असून, अफवांवर विश्वास न ठेवता निसंकोच पणे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी केले आहे. लसीकरण ही काळाची गरज असून, इतर नियमांचे पालन करताना लस देखील घ्यावी कारण ही महामारी रोखण्यासाठी लस हे प्रभावी माध्यम असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी लस घ्यावी आणि सुरक्षित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page