राष्ट्रीय पेयजलच बक्षीस पत्र केलेल्या जागे ऐवजी दुसऱ्या जागी विहीर कारवाईसाठी आंदोलन
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सन २०१८-१९ मध्ये मंजूर झालेल्या ३८ लाख ६६ हजार निधी खर्चाच्या विहिरीचे काम, बक्षीस पत्र झालेल्या जमिनीत न करता ते अन्य जमिनीत करण्यात आलेले आहे. या कामाची सखोल चौकशी करून चुकीच्या पद्धतीने झालेल्या निधी खर्चाची वसुली करावी. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी दांडेली येथील दशरथ खोत यांनी जिल्हा परिषदेसमोर आजपासून आंदोलन सुरू केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील दांडेली येथे सन २०१८-१९ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विहिरीचे काम मंजूर झाले. या कामासाठी 38 लाख 66 हजार निधीचे अंदाजपत्रक तयार करून विहिरीचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना प्रत्यक्ष बक्षीस पत्र करण्यात आलेल्या जमिनीत न करता ते दुसऱ्याच जमिनीत करण्यात आलेले आहे. संबंधित काम सुरू करताना विहिरीसाठी मोफत बक्षीस पत्राने जमीन देणाऱ्या जमीन मालकाला अगर सरपंच याना विश्वासात घेतलेले नाही .सदर विहिरीचे काम संबंधित शाखा अभियंता, उप अभियंता, ग्रामसेवक, यांनी संगनमताने बक्षीस पत्र करून दिलेल्या जमिनीत न करता दुसऱ्या जमिनीत केले आहे. यावर शासनाचा लाखो रुपये निधी अनाठाई खर्च झाला आहे. तरी या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांकडून खर्च करण्यात आलेला शासकीय निधी वसूल करावा. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.या मागणीसाठी दांडेली येथील दशरथ वसंत खोत यांनी जिल्हा परिषदेसमोर आजपासून आंदोलन सुरू केले आहे. तर याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना सादर केले आहे.
