डांगमोडे गावातील माकडांच्या बंदोबस्तासाठी पिंजरे बसविण्याची मागणी…

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुक्यातील मर्डे डांगमोडे वाडीत माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून माकडांकडून शेतीचे व फळझाडांचे नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डांगमोडे वाडीत ठिकठिकाणी पिंजरे बसविण्यात यावेत, अशी मागणी पोलीस पाटील शशांक ठाकूर यांनी सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्याकडे निवेदनातद्वारे केली आहे.

मर्डे डांगमोडे वाडीत गेल्या काही वर्षात काळ्या तोंडाची व लाल तोंडाची माकडे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यांच्या कडून शेतीचे, फळझाडांचे तसेच राहत्या घरांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या माकडांना पकडण्यासाठी गावात ठिकठिकाणी पिंजरे बसविण्यासाठी नियोजन करावे, असे पोलीस पाटील शशांक ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत सहाय्यक वनसंरक्षक श्री. सुनील लाड यांनी माकडांमुळे होणाऱ्या नुकसानी बाबत वनविभाग सतर्क असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्या बंदोबस्ताची मोहीम राबविण्यात येत आहे. डांगमोडे गावात देखील ही मोहीम राबविण्यात येईल असे आश्वासन दिले. पोलीस पाटील श्री. ठाकूर यांच्या या मागणी संदर्भात मर्डे ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनीही उप वनअधिकारी, वन विभाग सावंतवाडी यांचे लक्ष वेधत माकडांच्या बंदोबस्तासाठी पिंजरे बसविण्याची मागणी केली आहे.

You cannot copy content of this page