जिल्ह्यातील नेत्यांनी पत्रकार परिषदेत माहिती:सत्ताधारी पुढील सहा महिन्यात काय काम करतात हे पाहू; अन्यथा भव्य मोर्चा काढणार..
⚡सावंतवाडी ता.०२-: ठाकरे शिवसेना येणाऱ्या काळात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काम करणार आहे जनतेचे प्रश्न तळागाळात जाऊन सोडवण्यावर पक्षाचा भर राहणार आहे यासाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व नेते एकत्ररित्या नेतृत्व करून काम पाहणार आहेत अशी माहिती ठाकरे शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आज येथे पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
तर सत्ताधारी पुढील सहा महिन्यात काय काम करतात हे पाहून वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भव्य मोर्चा तसेच आंदोलने ही हातात घेऊन विरोधी पक्ष ही नगण्य नाही हे दाखवून देणार असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
