कणकवलीत ४ जानेवारीला साहित्‍य-संगीत संमेलन…

अध्यक्षपदी कवी अजय कांडर, तर माधव गावकर प्रमुख पाहुणे..

⚡कणकवली ता.०२-: सिंधुदुर्ग साहित्य – संगीत मित्र मंडळातर्फे कणकवलीत शनिवार ४ जानेवारी रोजी एक दिवसीय साहित्‍य – संगीत संमेलन होणार आहे. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होत आहे. या संमेलाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत अभ्यास माधव गावकर उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली. संगीत मैफल, पुरस्कार वितरण, साहित्य – संगीत याविषयी मार्गदर्शन आणि निमंत्रितांचे कविता वाचन असे स्वरूप या संमेलनाचे आहे. या कार्यक्रमात मैत्र साहित्य, मैत्री संगीत आणि मैत्र कला पुरस्कार देऊन अनुक्रमे कवयित्री संध्या तांबे, गायिका नेत्रा पाचंगे प्रभुदेसाई आणि चित्रकार सुमन दाभोलकर यांना गौरविण्यात येणार आहे. तर कवयित्री प्रमिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.

या कविसंमेलनामध्ये नामदेव गवळी, ऋतुजा सावंत भोसले, किशोर वालावलकर, मधुकर मातोंडकर, प्रगती पाताडे, प्रज्ञा मातोंडकर, योगिता शेटकर, मंगल नाईक जोशी, रीना पाटील, ॲड.मेघना सावंत, ॲड. प्राजक्ता शिंदे, प्रियदर्शनी पारकर, सत्यवान साटम, विशाल मराठे, दिशा राणे, प्रा.आर. के. हेदूळकर, श्रवण वाळवे, मुझफ्फर सय्यद,आर्या बागवे, संगीता पाटील, रीमा भोसले, निलेश केरकर, ॲड. अर्चना गव्हाणकर, पल्लवी शिरगावकर, संतोष जोईल, किशोर कदम, धर्माजी जाधव,नरेंद्रकुमार चव्हाण, निकेत पावसकर, हर्षल तांबे, जमील अन्सारी, श्रवण वाळवे, वैष्णवी सुतार, रिया परब, समिक्षा चव्हाण, समिक्षा गोसावी आदी कवींचे कविता वाचन होणार आहे. तरी साहित्य संगीत रसिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन श्री चव्हाण आणि श्री भंडारे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page