⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील नांदगाव बाजारपेठेत अनोळखी मनोरुग्ण इसम दुर्जन रीदास (वय 30) हा इसम नांदगाव येथे फिरत असताना तेथील ग्रामस्थांनी त्याला औषध उपचारकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याला रत्नागिरी येथील दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी शासकीय जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी दुर्जन रीदास हा इसम औषधोपचार चालू असताना 06 डिसेंबर 2024 रोजी मयत झालेला आहे. तरी मयत दुर्जन रीदास या इसमाचे नातेवाईक व त्यांच्या नावागावाचा शोध कणकवली पोलीसांकडून घेण्यात येत आहे. जर हा इसम कोणाच्या ओळखीत असेल, तर कणकवली पोलीस ठाणे 02367-232033 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदगाव येथे आढळलेल्या त्या इसमाचा रत्नागिरीत उपचारा दरम्यान मृत्यू…
