राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी देवबाग हायस्कूलची सलग दुसऱ्या वर्षी निवड…

⚡मालवण ता.३०-:
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेने इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी प्राथमिक दिव्यांग गटामध्ये घवघवीत यश संपादन करून सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. यामुळे अमरावती येथे होणाऱ्या ५२ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रतिकृतीसाठी डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेची निवड झाली आहे.

सदरच्या दिव्यांग प्रतिकृती साठी देवबाग हायस्कुल मधील विद्यार्थी कु. तेजस रामचंद्र केळुसकर व आयुष्य महेंद्र गोवेकर या दोघांची निवड झाली आहे. या प्रतिकृतीसाठी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. विवेक गोसावी यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली, श्रीमती पाटणे, श्री. उदय चोडणेकर यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्व संस्था चालक, प्रशालेतील इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर यांनी विजयी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय विज्ञान प्रतीकृतीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page