⚡मालवण ता.३०-: भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण संरक्षण विभागाच्या वतीने गावशाखा वडाचापाट येथे एक दिवशीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. यामध्ये एकूण ३० शिबिरार्थींनी सहभाग दर्शवला.
यावेळी समता सैनिक दलाचे प्रशिक्षक संजय जाधव यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या व जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. तर धूपप्रज्वलन तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांनी केले. तदनंतर सामूहिक त्रिसरण पंचशीलेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, सरचिटणीस प्रकाश पवार, मार्गदर्शक प्रशिक्षक व केंद्रीय शिक्षक, डिव्हिजन ऑफिसर मुंबई संजय जाधव, जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष दिलीप कदम तरंदळेकर, जिल्हा महिला संरक्षण उपाध्यक्ष प्रीतम जाधव, जिल्हा संरक्षण सचिव गुणाजी जाधव, जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, तालुका संरक्षण उपाध्यक्ष भगवान जाधव, तालुका महिला सरचिटणीस समता डिकवलकर सचिव रमेश कदम, तालुका हिशोब तपासणीस शंकर कदम, तालुका संस्कार सचिव योगेश वराडकर, प्रचार व पर्यटन सचिव सचिन कासले, जिल्हा संघटक लीना तळगावकर, माजी कार्यालयीन सचिव भानुदय कासले, सदानंद डिकवलकर, गाव शाखा वडाचापाट अध्यक्ष गणेश कासले, सचिव प्रतीक कसले, गावशाखा तळगाव अध्यक्ष संदीप तळगावकर, अमोल तळगावकर, पुरुषोत्तम कासले, गावशाखा महिला अध्यक्ष कासले, प्रांजली कासले, समता सैनिक सुषमा जाधव व मोठ्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस प्रकाश पवार यांनी सादर केले. या प्रशिक्षणाच्या सुरुवातीला समता सैनिक दलाच्या ध्वजाचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षक संजय जाधव यांनी सर्व शिबिरार्थींना मार्गदर्शन केले तसेच कवायतीच्या माध्यमातून प्रात्यक्षिकही घेतले व स्वसंरक्षण व आपल्या समाजाचे संरक्षण कशाप्रकारे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रात जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव विलास वळंजु, महिला तालुकाध्यक्ष नेहा काळसेकर यांनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार यांनी केले.
