मळगाव येथील खानोलकर वाचनालयात १८ रोजी वक्तृत्व स्पर्धा…

सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ला तालुक्यातील स्पर्धकांना होता येणार सहभागी:दोन शालेय गटात होणार स्पर्धा…

बांदा/प्रतिनिधी
मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात शनिवार दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता (कै.) डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ला तालुका मर्यादित असून दोन शालेय गटात घेण्यात येणार आहे. हि स्पर्धा डॉ. अरविंद खानोलकर यांनी पुरस्कृत केली आहे.
पाचवी ते सातवी या गटासाठी ‘मातृदेवोभव!’, ‘शिवराय आज असते तर..!’, ‘पुस्तकांच्या सहवासात मी..!’ हे विषय ठेवण्यात आले असून वेळ ४ ते ५ मिनिटे देण्यात आला आहे.
आठवी ते दहावी गटासाठी ‘रतन टाटा- यशाचे दुसरे नाव..!’, ‘सेंद्रिय शेती गरज व महत्व..!’, ‘वाचन संस्कृतीचे बदलते रुप आणि आजचा वाचक’ हे विषय ठेवण्यात आला असून वेळ ५ ते ६ मिनिटे देण्यात आला आहे. दोन्ही गटातील स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करायचे आहे.
दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७५०, ५०० रुपये रोख, प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी २०० रुपये रोख व प्रमाणपत्र पारितोषिक देण्यात येणार आहे.
एका शाळेतून जास्तीत जास्त तीन स्पर्धक विद्यार्थी एका गटात सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांना एसटी प्रवास खर्च व न्याहारीची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धक शाळांनी १७ जानेवारी पर्यंत ग्रंथपाल आनंद देवळी यांच्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन वाचनालयच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page