वीजपुरवठा खंडित होत असल्याने पर्यटन व्यवसायीक अडचणीत…

थर्टी फर्स्ट निमित्त पर्यटक वाढल्याने या समस्येत अधिकच भर:वीज पुरवठा नियमित चालू ठेवण्याची व्यावसायिकांची मागणी..

मालवण (प्रतिनिधी)

नाताळची सुट्टी व थर्टी फर्स्ट च्या निमित्ताने सध्या मालवणात पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून या ऐन पर्यटना हंगामात मालवणातील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने पर्यटन व्यवसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच पर्यटकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मालवणात डिसेंबर अखेरीचा पर्यटन हंगाम हा महत्वाचा मानला जातो. यां कालावधीत नाताळ सुट्टी व थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मालवणात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर सध्या मालवणात पर्यटकांनी गर्दी केली असून विविध हॉटेल्स, लॉज, रेस्टोरंट पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. मात्र आज दिवसभरात मालवणातील वीज पुरवठा अधून मधून खंडित होत राहिल्याने पर्यटकांना आवश्यक सुविधा पुरविताना हॉटेल्स व लॉज व्यवसायिकांना अनेक अडचणी आल्या. वीज खंडित होत राहिल्याने पर्यटकांना लाईट, पंखा, एअरकंडिशन, वाय-फाय तसेच पाण्याची सुविधा देताना अडचणी निर्माण झाल्या. यामुळे पर्यटन व्यवसायिकानी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर वीज खंडित झाल्याने निर्माण झालेल्या असुविधांबाबत पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली. ऐन पर्यटन हंगामात वीज वितरणने वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी पर्यटन व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page