लायन्स फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात…

कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर स्टॉल उभारणी सुरु..

⚡कुडाळ ता.२६-: लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल’ ला शुक्रवारी २८ पासून ३१ डिसेंबर पर्यत रोज सायंकाळी ६.०० नंतर कुडाळ हायस्कूलच्या भव्य मैदानावर सुरुवात होतं आहे. सिंधुदुर्गसह मुंबई पुणे कोल्हापूर आदी भागातून सुमारे ९० इंडस्ट्रियल, ऑटो एक्सपो, खाद्यपदार्थ व जनरल स्टॉल्स सहभागी झाले आहेत स्टॉल उभारणी काम अंतिम टप्प्यात आलेआहे ,
   सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या 23 व्या लायन्स फूड फेस्टिवलला उद्यापासून सुरवात होतं आहे सदरच्या महोत्सवामध्ये सर्व नामांकित ऑटोकंपन्यांच्या गाड्यांच्या वितरकांचे स्टॉल अनुभवण्यास मिळतील व हे ह्या वर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण आहे.  महोत्सवामध्ये इंडस्ट्रियल व जनरल स्टॉल्स साठी राज्यभरातून विविध प्रकारचे (हर्बल, आयुर्वेदिक, कॉसमेटिक प्रोडक्ट्स, शेती-घरगुती यंत्र इ.) स्टॉल्स अनुभवण्यास मिळणार आहेत. या सर्वांसोबतच खवय्यांसाठी मेजवानी म्हणून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील उपलब्ध असतील. फूड-स्टॉल्समध्ये विशेष आकर्षणाचे रुचकर चविष्ट पदार्थ, मराठमोळ्या खाद्य संस्कृतीने भरलेल्या चवदार पदार्थांचा आस्वाद घेण्यास मिळणार आहेत.
दि. २८ डिसेंबर रोजी “लायन्स फेस्टिव्हल” या महोत्सवाचे उद्घाटन हे ‘लायन्स डिस्ट्रिक्ट 3234D1’ चे उपप्रांतपाल लायन श्री. विरेंद्र चिखले, आम निलेश राणे,महाराष्ट्र चेबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर कोंकण रिजन उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे वेस्टर्न रीजन उपाध्यक्ष श्री. रमाकांत मालू  यांच्या उपस्थितीत होणार आहे.२८ रोजी संकल्प क्रीएशन, कुडाळ प्रस्तुत “नृत्यरंग 2024” हा एक रोमांचक नृत्य महोत्सव होणार आहे. . या मध्ये भारतातील शास्त्रीय, लोक नृत्या सोबत पश्चिमी नृत्य कलेचा कलाविष्कार कार्यक्रम सादर होईल.
दि.२९ रोजी जलवा 2024 होणार आहे  असेल.दिनांक ३० रोजी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष 2024″ हा डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्ट आयोजित केला आहे, या कार्यक्रमात हर्षद मेस्त्री (स्वरकोकण रत्न), स्नेहल गुरव (प्रथितयश पार्श्वगायिका) आणि काश्मीरा सावंत (प्रथितयश पार्श्वगायिका) यांसारखे अद्वितीय आणि प्रतिभावान कलाकार आपल्या मनमोहक गाण्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत, तसेच खास आकर्षण म्हणून या दिवशी मराठी चित्रपटअभिनेत्री व नृत्यांगना श्वेता परदेशी हिचा अद्भुत नृत्यांगनेच्या अदाकारीचा अनुभव या वेळी मिळणार आहे.दिनांक ३१ रोजी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत Countdown Begins 2025″ डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्ट आयोजित केला आहे. या कार्यक्रमात एकत्रितपणे विविध वाद्यकार, गायक आणि नर्तक आपली कला सादर करणार आहेत.  सुप्रसिद्ध गायकांच्या यादीत अनुष्का शिकतोडे (सूर नवा ध्यास नवा फेम), धनश्री कोरगावकर (महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम), गणेश मेस्त्री (इंडियन आयडॉल फेम) आणि हर्षद मेस्त्री (स्वरकोकण रत्न) यांसारखे प्रतिभावन प्रसिद्ध कलाकार आहेत, जे आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.याशिवाय, उत्कृष्ट अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि कोरियोग्राफर मिनाक्षी पोक्षे यांचे नृत्य सादरीकरण देखील असणार आहेत .३१ डिसेंबरच्या रात्री, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या अद्वितीय महोत्सवात सहभागी व्हा आणि एक अविस्मरणीय अनुभव मिळवा असे लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page