मळगाव हायस्कूलचे २७ डिसेंबर रोजी वार्षिक स्नेहसंमेलन…

⚡सावंतवाडी ता.२५:-
मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित, मळगांव इंग्लिश स्कूल, मळगांव प्रशालेचा ६४ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे संचालक सीताराम नाईक, तर प्रमुख अतिथी डॉ. स्नेहल गोवेकर (होमिओपॅथीक डॉक्टर, सावंतवाडी) असून मळगाव ऐक्य वर्धक संघ मुंबईचे खजिनदार मोहन मुळीक, शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन मनोहर राऊळ, शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रम दोन सत्रात होणार असून सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण तर सायंकाळच्या सत्रात संध्याकाळी ६ वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शक कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमास पालक, सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आस्वाद घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मळगाव ऐक्य वर्धक संघ मुंबईचे अध्यक्ष श्री. शिवराम तेली , सचिव श्री. आर. आर. राऊळ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एम. बी. फाले, पर्यवेक्षक एस.व्ही. कदम सर तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख बाबाजी सावंत, शालेय सांस्कृतिक मंत्री नारायण मांजरेकर, शालेय मुख्यमंत्री निधी राऊळ तसेच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page