कसई-दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची माहिती ;तालुकावासीयांनाही उपस्थित राहण्याचे केले आवाहन..
दोडामार्ग : भाजपाचे हिंदुत्ववादी नेते , कोकणचा ढाण्या वाघ तथा राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच दोडामार्ग तालुक्यात संध्याकाळी ४ वा. येत असून त्यांचे दोडामार्ग शहरवासीयांच्यावतीने जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.त्यांच्या या स्वागतासाठी तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.
भाजप चा कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी नितेश राणे यांची देशभरात ओळख आहे.राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच उद्या रविवारी संध्याकाळी ४ वा. दोडामार्ग तालुक्यात येत आहे.त्यानिमित्ताने दोडामार्ग ग्रामिण रुग्णालय ते शहर बाजारपेठ अशी भव्य रॅली काढून त्यांचे भव्यदिव्य असे स्वागत केले जाणार आहे.तरी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने तालुका वासीयांनि उपस्थित रहावे असे आवाहन कसई- दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे
