अल्टो कार व बुलटे मध्ये अपघात…

चिटनीस नाका येथील घटना:दोन्ही वाहानाचे मोठे नुकसान..

⚡सावंतवाडी ता.१५-: अल्टोकारला मागाहून येणार्या बुलेटची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले. तर बुलेटस्वार युवक किरकोळ जखमी झाला. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील चिटनीसनाका हनुमान मंदिर शेजारी घडला.

कोल्हापुर येथील पर्यटकांनी आपली अल्टो कार हनुमान मंदिर शेजारी पार्क केली होती. पार्क केलेली अल्टो रस्तावर आणत असतांना मागाहून येणार्या बुलेटस्वार चालक युवकाची कारला जोरदार धडक बसली. यात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. मात्र अल्टो कारचालकाने रस्त्यावरील वाहनांकडे दुर्लक्ष करत कार रस्त्यावर आणण्याने हा अपघात घडला असे बुलेटस्वार युवकांचे म्हणणे आहे. मात्र यात आपली काहीच चुक नसल्याचे कोल्हापुर येथील पर्यटकांचे म्हणणे होते. बुलेटस्वार सुसाट असल्याने गाडी कंट्रोल न झाल्याने त्याने कारवर आणून धडकली असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत अपघाताची माहीती घेत दोन्ही बाजूने तडजोडीचा प्रयत्न केला मात्र कोणीच तडजोडीस तयार नसल्याने दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. मात्र उशिरा हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले.

You cannot copy content of this page