नगरपालिकेच्या कामकाजाबाबत नागरिकांत नाराजी
⚡सावंतवाडी ता.१५-: येथील मच्छी मार्केट परिसरात वळणावर पाण्याचा पाईपलाईनच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्डा अद्याप पर्यंत बुजवण्यात आला नसल्याने त्यात एक वाहन रूतून मोठं नुकसान झाले. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान काम होऊन देखील खड्डा का बुजवला गेला नाही ? असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अपघात झालेल्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
