⚡वेंगुर्ला ता.१३-: नुकत्याच संपन्न झालेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
प्राथमिक गटातून वक्तृत्व स्पर्धेत मानसी वराडकर-प्रथम, निबंध स्पर्धेत भावना गावडे -द्वितीय, विज्ञान प्रतिकृतीमध्ये विद्यार्थ्यांमधून मानसी वराडकर व मनाली वगरे-तृतीय, माध्यमिक गटातून वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी धुरी-प्रथम, निबंध स्पर्धेत जाई धुरी-द्वितीय, प्रश्नमंजूषामध्ये मयुरी गावडे व किर्ती कुंभार-तृतीय, दिव्यांगांमधून पूनम गावडे-प्रथम, शिक्षक प्रतिकृतीमधून चैतन्य सुकी-प्रथम क्रमांक पटकाविले. या सर्वांचा वेंगुर्ला पोलिस रंजिता चौहान, अनुराधा देसाई आणि मनोज परूळेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संजय परब, के.डी.खरबडे, शिक्षक तानाजी चव्हाण, ओवी पवार, सुजाता नाईक, निलेश पेडणेकर व विद्यार्थी उपस्थित होते.
