कणकवली परबवाडी येथील श्री दत्तमंदिरात श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन…!

⚡कणकवली ता.१२-: येथील श्री दत्तमंदिर परबवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी १० वाजता झोळी फिरणे, सायंकाळी ६ :०२ वाजता दत्तजन्म, रात्रौ ८ वाजता महाप्रसाद, रात्रौ ९:३० वाजता भजनांचा कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली येथील शिवाजीनगर, परबवाडी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page