⚡दोडामार्ग ता.०६-: भाजी वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोची धडक बसल्यामुळे झरेबांबर येथे एका सात वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला.ती रस्ता ओलांडत असताना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. श्रेया संदीप गवस (रा. मांगेली) असे तिचे नाव आहे. तिला अधिक उपचारासाठी तिथून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पुर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. यावेळी चालकाला चोप देण्यात आला. तो अल्पवयीन असल्याची आणि त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याची चर्चा घटना
स्थळावर होती.संबंधित टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी जमावाकडून करून करण्यात आली आहे.श्रेया ही काल झरेबांबर येथे आपल्या मामाकडे जत्रेसाठी आपल्या आईसह आली होती. आज ती घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोची धडक बसून हा तिसरा बळी गेला आहे. यापूर्वी वायंगणतड येथे दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक आणि लिफ्ट मागून साटेली भेडशी पर्यंत आलेली मागे बसलेली महिला असे दोघे ठार झाले होते.
टेम्पोची धडक बसल्यामुळे झरेबांबर येथे एका सात वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू …!
