मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या सावंतवाडीत जाहीर सभा…

⚡सावंतवाडी ता.१५-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे दोन्ही प्रमुख नेते उद्या शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ दुपारी ३ वाजता सावंतवाडी , गांधी चौक येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे . तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत सभा घेणार आहेत . त्यामुळे सावंतवाडीत येऊनमुख्यमंत्री नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

You cannot copy content of this page