ज्येष्ठ मच्छिमार रोहिदास कुमठेकर यांचे निधन…

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण दांडी येथील रहिवासी रोहिदास आत्माराम कुमठेकर (वय ८६) यांचे राहत्या घरी बुधवारी निधन झाले.

रोहिदास कुमठेकर हे आयुष्यभर अनवाणी चालले. आपले लग्न वगळता त्यांनी कधीच पायात चप्पल घातली नाही. ज्येष्ठ व जुने जाणते मच्छिमार म्हणून ते परिचित होते. जिल्हा सागरी सल्लागार समितीचे ते ज्येष्ठ सदस्य होते. त्यांना मच्छीमारी संदर्भातील सल्लामसलत करण्यासाठी निवडले होते. पारंपरिक मच्छीमारांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सातत्याने ते मांडत असत. जुन्या पद्धतीच्या मच्छीमारीचे त्यांना ज्ञान होते. तसेच अध्यात्म व वनौषधी याविषयी देखील त्यांचा अभ्यास होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, भाऊ, भावजयी, नातवंडे असा परिवार आहे. मच्छीमार नाना कुमठेकर, पर्यटन व्यावसायिक पांडू कुमठेकर यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page