महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ’ चा आमदार नितेश राणे यांना पाठिंबा…

कणकवली : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ च्या वतीने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली व पाठिंबा जाहीर केला. आमदार नितेश राणे हे अडचणीच्या वेळी व समस्या निर्माण करण्यासाठी वेळोवेळी आमच्या सोबत असतात. उद्भवलेली समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आमदार नितेश राणे यांची मोठी मदत आम्हाला होते. असे मत यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

यावेळी कमळाकरजी मांगले पाटील महाराष्ट्र राज्य सचिव, गणेश ढेणे पाटील रायगड जिल्हा संघटक, कृष्णा माळी पाटील रायगड जिल्हा सहसचिव, हेमंत सावंत पाटील सिंधुदुर्ग जिल्हा सचिव, उदय सावंत पोलीस पाटील कणकवली तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page