सबनीसवाडा येथे उद्या त्रिपुरारी पौर्णिमा जागर उत्सव…

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: सबनीसवाडा येथील श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर येथे उद्या शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी प्रतिवार्षिक प्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा जागरउत्सवा निमित्त मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त सायंकाळी ६.०० वाजता दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंदिराच्या पुर्ण परीसरात मातीच्या पणत्या प्रज्वलीत करुन दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता तुलसी विवाह, रात्री ८.०० वाजता सुश्राव्य भजन, १०.०० वाजता श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा “”भक्ती महिमा” हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर सबनीसवाडा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page