परशुराम उपरकर:सिंधुदुर्गातील त्या दोन कार्टूनाचा पराभव करा..
⚡सावंतवाडी ता.१३-: दीपक केसरकर यांनी काही वर्षांपूर्वी याच व्यासपीठावरून नारायण राणे हे मायनिंग चे दलाल आहेत. अशी टीका केली होती. तर नारायण राणे यांनी याच व्यासपीठावरून दीपक केसरकर यांच्यावर केसरकरांचे वडीलांवर टिका केली होते. ते दोघेही आज स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एकत्र आले आहेत. अशी जोरदार टीका माजी आमदार जीजी उपरकर यांनी केली.
यावेळी दीपक केसरकर हे राष्ट्रवादीत असताना मा. शरद पवार यांच्या फोटोची आरती करूनच घराबाहेर पडत होते. परंतु, त्यानंतर त्यांना समजले की, यावेळी निवडणुकीत शिवसेनेची सत्ता येईल त्यावेळी त्यांनी राणेंचा दहशतवाद हा मुद्दा उभा करून शिवसेनेत प्रवेश केला. ते आज तीच शिवसेना फोडून शिंदे सोबत जाऊन बसलेत आणि आता आमच्यासारख्या कट्टर आणि जुन्या शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे कसे होते ते शिकवत आहेत. त्यामुळे आता आम्हालाच समजत नाही. की नक्की आम्ही जुने शिवसैनिक आहोत की हे जुने शिवसैनिक आहेत. असा खोचक टोला लगावला आहे.
यावेळी भाजपचा नादाला लागून शिवसेनेला संपवायला निघालेल्या शिंदे सेनेचा पराभव करणे गरजेचे असून, सिंधुदुर्गातील त्या दोन कार्टूनाचा पराभव करा अशी मागणी आता संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे. अशी टीका देखील त्यांनी नितेश राणे व निलेश राणे यांचे नाव न घेता केली.
नितेश राणे हे स्वतः ला हिंदूचे जननायक समजतात. परंतु, ज्यावेळी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यावेळी यांच्या तोंडातून एक शब्द देखील फुडला नाही. हे कसले हिंदुत्व असा सवाल देखील उपस्थीत केला. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी जवळ येत असून, या गद्दार शिंदे सेनेला हरवून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली देऊया असे आवाहन जीजी उपरकर यांनी जनतेला केले आहे.
