सावंतवाडीची इज्जत घालवणाऱ्या दीपक केसरकरांचा पराभव निश्चित…

शरद कोळी:सावंतवाडीची जनता गद्दाराना क्षमा करणार नाही..

⚡सावंतवाडी ता.१३-: स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी 50 खोके घेऊन सावंतवाडीची इज्जत घालवणाऱ्या दीपक केसरकर यांचा पराभव निश्चित असून, येथील जनता गद्दाराना क्षमा करणार नाही. अशी टीका शिवसेना नेते शरद कोळी यांनी केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षणमंत्री झाल्यानंतर दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील शाळेचे वाटोळे केले असून, अनेक जिल्हा परिषद शाळांना टाळे लागले. अशी जोरदार टीका केली. ज्यावेळी आमचा पक्ष फोडला, धनुष्यबाण चोरल त्यावेळी निवडणूक आयोग कुठे गेले होते. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी राजन तेली यांना 75 हजाराच्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page