अर्चना घारेंना महाविकास आघाडीची मत खाण्यासाठी केसरकरांनी उभे केले…

विनायक राऊत:सावंतवाडीत येऊन नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली तरी सावंतवाडीची जनता यांना जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही..

⚡सावंतवाडी ता.१३-: अपक्ष उमेदवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. महाविकास आघाडीची मत खाण्यासाठी यांना उभे केले गेले आहे. त्यामुळे मशालीला मत द्या, महाविकास आघाडीच सरकार राज्यात आणा असे आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले.

दरम्यान राजन तेली यांच्या सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याची किंमत भाजपला कळली नाही. त्यांना उमेदवारी न देता धोकेबाज लोकांना उमेदवारी दिली गेली. सावंतवाडीत येऊन नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली तरी सावंतवाडीची जनता यांना जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही. केसरकर आजही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करू शकले नाहीत.‌ येत्या वर्षभरात हे हॉस्पिटल सुरू केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page