देवा मला पाव अशी केसरकर यांची परिस्थिती…

उद्धव ठाकरे:केसरकर पडले तरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भले होईल..

⚡सावंतवाडी ता.१३-: कोकण आणि शिवसेनेचे नातं फार जुने आहेत. आता तर जुने शिवसैनिक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळें राजन तेली यांचा विजय निश्चितच आहे. असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी दीपक केसरकर हा सज्जन माणूस वाटला होता. परंतु, साई बाबांचा भक्त म्हणवणाऱ्या या माणसात त्यांनी दिलेली श्रद्धा आणि सबुरी हा कानमंत्रच नाही. मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी त्यांची परिस्थिती आहे. अशी जोरदार टीका दीपक केसरकर यांच्या वर उध्दव ठाकरे यांनी आज आयोजीत प्रचार सभेत केली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराजांचा पुतळा कोसळला यातून काय चांगल होणार होत. असा प्रश्न त्यांनी केसरकरांना विचारत, केसरकर पडले तरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भले होईल अशी टीका देखील केली. मी मुख्यमंत्री असताना अनेक गोष्टी इथ आणायच्या होत्या. परंतु, खोडा कोणी घातला, अद्याप हॉस्पिटल का उभ राहील नाही. असा सवाल देखील उपस्थीत केला. अदानीचे दलाल बनून केसरकर जिल्ह्यात फिरत होते. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

लोकसभा निवडणुकीला चुकीच्या माणसाला तुम्ही का डोक्यावर घेतल 2004-05 साली इथे भीतीदायक वातावरण होते. परंतु, विनायक राऊत आणि वैभव नाईक या दोघांनी येथील जनतेला उभारी दिली. परंतु, आता पुन्हा एकदा तुम्हाला संधी आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना निवडून आणून त्या दहशतीला आळा घाला. महाराष्ट्राचा कारभार गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला जातोय. तो हाणून पाडण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचे आहे.

You cannot copy content of this page