महायुतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी श्रीबांदेश्वर चरणी अभिषेक…

शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांचे साकडे..

बांदा :

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून यावेत, या मागणीसाठी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी स्वयंभू श्री बांदेश्वर चरणी अभिषेक केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसरकर, कुडाळ मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितेश राणे विजयी होऊन राज्यात महायुतीचे शासन येऊ दे, अशी प्रार्थना यावेळी श्री बांदेश्वर चरणी करण्यात आली.

    यावेळी श्री बांदेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, मंदार नार्वेकर, सुनील धामापूरकर, श्रीधर सावंत, साई धारगळकर, दिनेश नाईक, प्रवीण नाईक, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, प्रशांत बांदेकर, गिरीश नाटेकर, संजय बांदेकर, अक्षय नाटेकर, साई सावंत, निलेश नाटेकर, प्रवीण नाटेकर, गुरू धारगळकर, राजेश विर्नोडकर, पांडुरंग नाटेकर, भैय्या गोवेकर, प्रसाद महाजन, रमेश परब, श्री. कवठणकर, ग्लेटस फर्नांडिस, सत्यवान बांदेकर, श्री. सावंत आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page