मायकल डिसोजा: दीपक केसरकरांनी कितीही लोकांना अमिष दाखवले तरी जनता बळी पडणार नसून त्यांच डिपॉझिट जप्त होणार..
⚡सावंतवाडी ता.१२-: कालपर्यत केसरकरांच्या नावाने बोंब मारणारे आज केसरकरांच्या बाजूला बसून गुणगाण घाऊ लागेल हे आश्चर्यचकित करणारे आहे. परंतु ही निष्ठा नसून खोक्याचा परिणाम आहे असा टोला मायकल डिसोंजा यांनी बाळा गावडे यांच्या शिंदे शिवसेना प्रवेशावर केली.
आज गावात गावात जाऊन साड्या वाटप तसेच मोठ्या खोक्याचा वापर केला जात आहे. परतु आम्हाला कुठेही हे वाटताना आढळल्यास आम्ही ते पकडणारच आणि कितीही आमिष दाखवली तरी जनता तुमच्या खोक्यांना बळी पडणार नाही आशी टिका त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की दिपक केसरकर हे विकासाच्या गोष्टी करत आहेत . परंतु, तुम्ही काय विकास केला हे तरी जनतेला सांगा गेल्या १५ वर्षात सावंतवाडी मतदारसंघाची वाट लावली त्यामुळे केसरकरानी कितीही पर्यत केला तरी ते यशस्वी होणार नाहीत. त्यांचे डिपाझीट जप्त होण्याची वेळ त्याच्यावर आल्याची टिका मायकल डिसोझा यांनी केली.
