अँड.दिलीप नार्वेकर: त्या जागेचा प्रश्न सुटण्यासाठी पुढची निवडणुक उजाडेल..
⚡सावंतवाडी ता.१२-: मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असलेली जागा भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेजच्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून आवश्यक ती पूर्तता करून उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा हट्ट दीपक केसरकर यांनी सोडावा असा दावा माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एडवोकेट दिलीप नार्वेकर यांनी केला.
तर उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी च्या जागेचा प्रश्न सुटण्यासाठी पुढची निवडणुक उजाडेल हे सत्य आहे माझे आणि केसरकर यांचे काही वर नसून आयुर्वेदिक कॉलेजच्या जागेत मल्टीस्पेशालिटी उभारल्यास येथील आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटेल असेही ते म्हणाले.
