अर्चना घारे: मतदारसंघातील आरोग्याची सुविधा ही व्हेंटिलेटरवर..
⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांनी गेल्या 15 वर्षात कोणत्याही आरोग्य सुविधा या मतदारसंघात उपलब्ध करून न दिल्यानेच येथील लोकांना गोवा बांबोळी किंवा बेळगाव, कोल्हापूर यावर अवलंबून राहावे लागत असून, अपघातात जबर जख्मी झालेल्या रुग्णांना तिथं पर्यंत नेईपर्यंत अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेली अनेक वर्ष येथील लोकप्रतिनिधी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे गाजर येथील जनतेला दाखवत आहेत. या मतदारसंघातील आरोग्य सुविधा हि व्हेंटिलेटर वर असल्याचा आरोप आज अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता केला आहे.
