मालवण (प्रतिनिधी)
श्री सरस्वती साईश्वरी संस्था, मुंबई तर्फे नाशिक येथील इगतपुरी मध्ये गरजू व गरीब लोकांना दीपावली निमित्त फराळ, साबण, कंदील, खाद्य पदार्थ, धान्य, कपडे तसेच मुलांना शैक्षणिक साहित्य व खेळणी यांचे वाटप करून त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करण्यात आली.
या साहित्य वाटप कार्यक्रमास सह प्रायोजक म्हणून प्रवरा प्रमोद मनचेकर, प्रियांका अमोल नार्वेकर , अवनी राऊळ याचे सहकार्य लाभले. यावेळी संस्थापक सुरज बांदकर, लोकेश जैन, सुजाता टिकम, दत्तात्रेय पडवळ, पुष्पा मोरे, चित्तरंजन बांदकर, नरेश करलकर आदी उपस्थित होते.
