अमित परब: जनसामान्यांचा आशीर्वाद मिळत असल्याने विशाल परब कोकणात इतिहास घडवतील..
⚡सावंतवाडी ता.०९-: गेल्या पंधरा वर्ष विकासापासून वंचित ठेवलेल्या सावंतवाडी मतदारसंघाला पुन्हा एकदा विकास कामांना उभारी देण्यासाठी विशाल परब हे निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, त्यामुळे विशाल परब यांना मिळत असलेल्या वाढता पाठिंब्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित असून ते कोकणात एक इतिहास घडवतील असा विश्वास अमित परब यांनी आज व्यक्त केला.
दरम्यान गेले पंधरा वर्षे या मतदार संघात अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या आहेत. मात्र ते प्रकल्प कुठेही दिसले नाहीत रोजगाराचे विषय असतील हॉस्पिटलचा विषय असेल असेन कामांपासून सावंतवाडील वंचित राहिली आहे. त्यामुळे जनतेमध्ये असलेली नाराजी पाहून ते नक्कीच यावेळीला परिवर्तन करून विशाल परब यांना साथ देतील व विशाल परब हे कोकणात इतिहास घडतील असा विश्वास अमित परब यांनी व्यक्त केला.
