वैभववाडी प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रवृत्तीपदी युवा सेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे स्वप्निल धुरी हे शिवसेनेचे युवा नेतृत्व असून युवा सेनेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे तसेच गेले लोकसभा निवडणुकीत ही प्रचार प्रवक्ता म्हणून काम केले आहे त्यांच्या कामाची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाच्या प्रचार प्रवक्ते पदी निवड केली आहे त्याने अलीकडेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत आपल्या युवा सेना सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता त्यांची समजूत काढण्यात आली असून त्यांच्यावर ही वक्ते पदाची मोठी जबाबदारी दिली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेली जबाबदारी सर्व वरिष्ठांना विश्वासात घेऊन आपल्या कामातून दाखवून देऊ असा विश्वास त्यांनी निवडीनंतर व्यक्त केला आहे.
ठाकरे सेनेचे स्वप्नील धुरी जिल्ह्याचे प्रचार प्रवक्ता…
