बाबू कुडतरकर: कोणी कितीही प्रयत्न केले तरी केसरकर यांचा विजय निश्चित..
⚡सावंतवाडी ता.०१-:* मळगाव येथे दोन दिवसांपूर्वी विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न हा केवळ स्टंटबाजी असल्याचा टोला शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकरर यांनी लगावला. दरम्यान विजय होण्यासाठी असे किती प्रकारची नौटकी केली तरी जनता भूलथापांना बळी पडणार नसून केसरकर यांचा विजय निश्चित आहे असे कुडतरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
