आगीत जळून खाक झालेल्या बेकरीची संदेश पारकर यांनी केली पहाणी…!

⚡कणकवली ता.०१-: येथील पटवर्धन चौकात आरबी बेकरी सहित बर्डे मेडिकल व राजू गवाणकर यांच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व महाविकास आघाडी चे उमेदवार संदेश पारकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच या ऐन दिवाळीच्या तोंडावर लक्ष्मीपूजना दिवशी घडलेल्या या घटनेबाबत दुःख देखील व्यक्त केले.

त्यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, वैभव मालंडकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page