अँड.समीर वंजारी: घटनेचा केला जाहीर निषेध..
सावंतवाडी ता.३१-:अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न हा अतिशय निंदनीय असून ही घटना सावंतवाडीच्या संस्कृतीला अशोभनीय आहे, असं मत काँग्रेसचे युवा नेते अँड समीर वंजारी यांनी व्यक्त केले. दरम्यान निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु अशा संविधानिक हक्कावर दडपण आणण्याचा प्रकाराला उत्तर सावंतवाडीतील जनता आता मतपेटीतूनच देईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस व काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नेहमी अशा संस्कृतीचा विरोध करत आलेला आहे आणि तो विरोध करत राहणार आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेबाबत मी काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
