राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड चाचणी…!

⚡मालवण ता.२८-: सांगली येथे दिनांक ७ ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या ज्युनिअर गटाच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ निवड चाचणी स्पर्धा गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत वराडकर हायस्कूल कट्टा तालुका मालवण येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष श्री विलास वाईरकर व उपाध्यक्ष ऋषिकेश नाईक यांनी दिली आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू जन्म तारीख २ जानेवारी २००५ नंतर जन्मलेला असावा निवड चाचणीस येताना आधार कार्ड, जन्म दाखला , बोनाफाईड दाखला, दोन फोटो तसेच दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले बोर्ड सर्टिफिकेट सोबत आणावयाचे आहे अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव संजय पेंडूरकर मोबा ९४२२३९२७९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page