*💫वैभववाडी दि.१५-:* वैभववाडी तालुक्यासह दिगशी येथील आरटीपीसीआर टेस्ट सेंटर व सांगूळवाडी कोविड सेंटरला कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहे. आत्तापर्यंत तालुक्यात 400 पेक्षा जास्त आकडा कोरोना बाधीत झालेल्या रुग्णांचा आहे.दिगशी गावात 139 लोकांचे स्वॅब घेण्यात आले . त्यापैकी 63 रुग्ण पॉझिटिव आढळले आहेत. वैभववाडी तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिगशी कंटेंटमेन्ट झोन व सांगुळवाडी येथील कोविड सेंटरला गुरुवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर महसूल विभाग,आरोग्य विभाग व पोलीस विभागाचा आढावा घेतला.ज्याच्या कडून रुग्णांना जेवण दिले जाते.त्यांनी रुग्णांना चांगल्या प्रतीचे जेवण दयावे,तसेच आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या आरोग्याची काळजी घ्यावी,कोणीही हलगर्जीपणा करू नये अशा सूचना दिल्या. यावेळी वैभववाडी तहसीलदार रामदास झळके,कणकवली तहसीलदार आर.जे.पवार,पोलीस निरीक्षक अतुल जाधव,आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार,डॉ. सोनवणे,मंडळ अधिकारी पावसकर, तलाठी श्रीमती माळी व अन्य कर्मचारी यावेळी होती.
वैभववाडी तालुक्यातील दिगशी व सांगूळवाडी कोविड सेंटरला प्रांताधिकारी यांची भेट…
