जिकडे संजू परब तिकडे विजय निश्चित…

संजू परब: केसरकर यांना ५० हजारच्या मतांनी निवडून अण्णार; तर शिंदे गटात प्रवेश केला तरी भाजपचे उपकार कधीही विसरणार नाय..

सावंतवाडी ता.२४-: संजू परब जिथे असतो तिथे विजय निश्चितच असतो, त्यामुळें या विधानसभेत मंत्री दीपक केसरकर यांना 50 हजारच्या मताधिक्याने निवडून आणणार असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते प्रथमच पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, भाजपने मला खूप प्रेम दिले आहे. त्यांनी मला नगराध्यक्ष देखील केले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर केलेले उपकार मी कधीच विसरणार नाही असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. महायुती मधून दीपक केसरकर यांना निवडून आणण्यासाठी आता काम करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विधानसभेसाठी मी इच्छुक होतो. परंतु महायुतीने केसरकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता आपण महायुती म्हणून केसरकर यांचे काम करणार असल्याचा देखील श्री. परब यांनी स्पष्ट केले‌.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, परिक्षित मांजरेकर, दिना नाईक, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page