विकासासाठी आमदारकी हवी तर पंधरा वर्षात काय केलं…?

रुपेश राऊळ: मी नाराज नाही, तन-मन-धन अर्पण करून राजन तेलींना निवडून आणणार..

⚡सावंतवाडी ता.२२-: गेली 15 वर्ष आमदार असूनही त्यांना याही वेळी आपली अपुरी राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनतेने आपणाला आमदार करावी अशी मागणी आजही जर दीपक केसरकर यांना जनतेकडे करावी लागत असेल तर दीपक केसरकर यांनी गेली 15 वर्ष मतदार संघात काय विकास केला तो दिसून येतोय. ते स्वतः आपण काम करू शकलो नाही हे जाहीर करत आहेत. त्यामुळे यावेळी जनता त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवून घरी बसवेल असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर त्यांना गावागावात जाऊन महिलांना साड्या आणि भजन मंडळांना तबला पेटी वाटण्याची वेळ आली आहे. परंतु, दीपक केसरकर यांना कितीही वेळा आमदार केले तरी देखील ते विकास करू शकत नाहीत. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

यावेळी त्यांनी राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशामुळे आपण अजिबात नाराज नाही. पक्ष जो उमेदवार देईल त्यांचे काम तन मन धन अर्पण करून करणार असे जाहीर केले आहे. तसेच आपण इच्छुक नक्कीच होतो. पण पक्ष जी जबाबदारी देईल ती नक्कीच पार पाडणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

You cannot copy content of this page