राजन तेली: साड्या वाटल्या प्रकरणी केसरकरांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार..
⚡सावंतवाडी ता.२२-: गेल्या 15 वर्षात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विकास जर तुम्ही केला आहात तर आज निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मतदारसंघात महिलांना साड्या आणि भजन मंडळांना तब्बला पेटी वाटण्याची गरज का भासली..? असा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांना केला असून, येत्या 23 तारीख ला जनता तुम्हाला बाय बाय करत घरी बसवणार अशी टीका देखील केली आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, गेली 15 ही वर्ष दीपक केसरकर हे सत्तेतील आमदार आहेत तसेच मंत्री पद देखील त्यांनी भूषवले आहे. तरी देखील त्यांना आपल्या मतदार संघाचा विकास करता आला नसल्याचे ते निष्क्रिय आमदार ठरले आहेत. त्यामुळें आता सावंतवाडी मतदारसंघातील जनता बदल केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे देखील राजन तेली यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
ते पुढे म्हणाले की केसरकर निवडणूका आल्या की मला विकास करायचा आहे म्हणतात मग पंधरा वर्षे तुम्ही काय करत होता…?असा तेली यावेळी उपस्थित केला. तर मतदारसंघात साड्या वाटल्याप्रकरणी केसरकर यांची मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे देखील तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.
