सावंतवाडी येथे विविध शेतकरी संघटनांची बैठक…!

⚡बांदा ता.२१-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शेतकरी फळबागायतदार संघाने निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याने आज वेंगुर्ला व सावंतवाडी येथे विविध शेतकरी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी उमेदवार उभा करण्यासंदर्भात एकमत होऊन सर्व शेतकरी संघटनानी एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

वेंगुर्ले तालुक्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी आणि सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची विधानसभा निवडणूकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्याविषयी चर्चा, विनिमय बैठक वेंगुर्ला येथे जयप्रकाश चमणकर तसेच सावंतवाडी येथे जेष्ठ समाजसेवक आणि गोवा मुक्ती संग्राम सैनिक वसंत (अण्णा) केसरकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात शेतकरी उमेदवार उभा करण्याविषयी एकमत होऊन सर्व शेतकरी संघटनानी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
सदर बैठकीस सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत, सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे संचालक दिवाकर म्हावळणकर, सामाजिक कार्यकर्ते आणि रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे, उद्योजक आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई, प्रगतशील शेतकरी निलेश नाडकर्णी, अण्णा केसरकर, सामाजिक कार्यकर्ते आणि वेंगुर्ला नगर परिषदेचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, राजा शिवाजी शेतकरी संघटना वेंगुर्ला अध्यक्ष श्यामसुंदर राय, शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटना अध्यक्ष राजेंद्र अंदुर्लकर, सचिव हनुमंत गवंडी, सदस्य भानुदास गवंडी, शेखर नाईक, गजेश नाईक, शरद आरोसकर, शिरोडा वेळागर सर्व्हे क्र. ३९ संघर्ष समिती पदाधिकारी आजू आंबरे, आग्नेल सोज, नेल्सन सोज आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page