वेंगुर्ला प्रतिनिधी-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून रविवारी वेंगुर्ला शहरात पथ संचलन करण्यात आले.
शिरोडा नाका, लकी स्टोअर्स, मा रुती स्टॉप, वेंगुर्ला बाजारपेठ, दाभोली नाका ते परत शिरोडा नाका असे पथ संचलन करण्यात आले. या पथ संचलनात उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरिक्षक संदिप भोसले यांच्यासह 6 पोलिस अधिकारी, 32 पोलिस अंमलदार व सीआयएसएफचे 25 जवान सहभागी झाले होते.
फोटोओळी – निवडणुकीच्या पार्श्वूमीवर वेंगुर्ल्यात पोलिसांकडून पथ संचलन करण्यात आले.
वेंगुर्ल्यात पोलिसांचे पथ संचलन…!
