नर्मदाआई संस्थेच्या दिवाळी खरेदी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद…

३०० महिलांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान..

कुडाळ : नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त कुडाळमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवशीय विशेष प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाला फार चांगला प्रतिसाद लाभला. रविवारी सायंकाळी या महोत्सवाची सांगता झाली.
दि. १८, १९ आणि २० ऑक्टोबर या तीन दिवशी नर्मदआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त कुडाळच्या महालक्ष्मी सभागृहात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होत. खरेदी महोत्त्सवात एकूण ३२ महिला उद्योजक आणि व्यावसायिकांनी आपले स्टॉल्स लावले होते. त्या सर्वाना खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
यावर्षीच या महोत्सवाचं वैशिट्य म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती वर्ष साजरं होत आहे. त्या निमित्तानं महिला सबलीकरणाचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घेतलेला वसा पुढे नेत नर्मदाआई संस्थेच्या वतीने महिला सबलीकरणाच्या कार्यात सक्रीय असणाऱ्या ,गावातील शेवटच्या महिलेला सक्षमीकरणाच्या प्रवाहात घेऊन येणाऱ्या कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या ३०० महिलांचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. रोज १०० महिलांचा गौरव करून त्यांच्या उमेदीला भरारी देण्यासाठी बळ देण्याचा छोटासा प्रयत्न नर्मदआई संस्थेच्या वतीने करण्यात आला.
सांगता सोहळ्याच्या निमित्ताने कुडाळ इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा आणि गावातील बचतगटात कार्यरत असणाऱ्या महिलांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे, सचिव दीप्ती मोरे, ,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा संजना काणेकर, सौ. सायली प्रभू, सौ. पडते, सौ. सुप्रिया वालावलकर, यशदाच्या मास्टर ट्रेनर आरती पाटील, साधना माडये उपस्थित होत्या. सर्वांचं स्वागत संध्या तेरसे यांनी केलं. प्रास्ताविकातून संध्या तेरसे यांनी कार्यक्रमागचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनतर कुडाळ इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्य जयंती निमित्त ग्रामीण भागातल्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
यावेळी बोलताना सायली प्रभू आणि सुप्रिया वालावलकर यांनी नर्मदाआई संस्थेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. गेली पाच वर्ष नर्मदाआई संस्थेच्या माध्यमातून हा खरेदी महोत्सव सुरु असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदा देखील या महोत्सवाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेच्या जयंतीची साथ होती. त्याच औचित्य साधून ग्रामीण भागातील महिलांना सन्मानित करण्यात आलं असं संध्या तेरसे यांनी सांगितलं.
यावेळी नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे यांच्यासह सचिव दीप्ती मोरे संचालक सौ. जयश्री सावंत, श्रीमती जान्हवी मोरे, सौ प्राजक्ता तेरसे, सौ.अक्षता कुडाळकर, सौ मृणाल देसाई, सदस्य सौ साधना माड्ये, सौ सुप्रिया वालावलकर, सौ आरती पाटील उपस्थित होत्या. या महोत्सवाला भाजपचे कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, रुपेश कानडे यांची भेट दिली. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रेया कुलकर्णी यांनी केलं. या महोत्सवाला विविध भागातून आलेले स्टॉलधारक, ग्राहक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page