Headlines

सी.आर .चव्हाण यांची शिवसेना उ.बा.ठा.कणकवली विधानसभा विभाग समन्वयक पदी निवड…!

कणकवली दि.१८ऑक्टोंबर (प्रतिनिधी) शिवसेना उ.बा.ठा. जिल्हा शाखा सिधुदुर्गची जिल्हा कार्यकारीणीची सभा मा. अध्यक्ष संदेश पारकर यांचे अध्यक्षतेखाली,मा .सतिश सावंत विधानसभा गटनेते , मा.आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली. या सभेत विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आखणी करण्यात आली.त्याजबरोबर काही महत्वाच्या कमिट्यांची ही रचना करण्यात आली .
यामध्ये अनु .जाती मोर्चाच्या कणकवली विधानसभा समन्वयक पदी बहुमताने श्री. सी.आर.चव्हाण यांची निवड करण्यात आली. सी. आर . चव्हाण .हे शिवसेना (उबाठा) . गटाचे सक्रीय व निष्ठावान कार्यकर्ते आहेत . तसेच ते संदेशजी पारकर यांचे विश्वासू व निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत . त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांना ही जबाबदारी दिली आहे.

पद असो या नसो पण शिवसेनेचा निष्ठावान सैनिक म्हणून,पक्ष देईल ते काम करून , पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आणि पक्ष देईल त्या उमेदवारासाठी काम करून , विजयाचा वाटेकरी होणार असेही सी .आर .चव्हाण म्हणाले.

ते प्रवासी संघ कणकवली या सघटनेचे सचिव , भारतीय चर्मकार समाज या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष , माहिती अधिकार जनजागृती अभियान संस्था – महाराष्ट्र या संस्थेचे प्रदेश सचिव, म्हणूनही सक्रीय आहेत. मानवाधिकार संघटना – अध्यक्ष , ग्राहक पंचायत – संघटक , क्रास्ट्राईब ग्रामसेवक संघटना – सल्लागार या संघटनामध्ये सामाजिक कार्य करतात.

You cannot copy content of this page