समीर वंजारी यांचा सल्ला; शेवटच्या क्षणापर्यंत हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न करणार..
सावंतवाडी ता.१८-:
राजन तेली यांनी शिवसेना सोडून चूक केली की नाही ते आम्हाला महत्वाचं नसून, काँग्रेस मध्ये येऊन चूक केली अस म्हणत असतील तर त्याच काँग्रेसने त्यांना आमदार केले हे विसरू नये असा टोला समीर वंजारी यांनी लगावला आहे. दोन वेळा सत्ता असणाऱ्या पक्षात असून देखील त्यांना त्यांचा पक्ष आमदार करू शकला नाही. जर त्यांना उद्या महविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली तर त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमित होतील असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसने ज्या ज्यावेळी शक्य झाले त्यावेळी प्रत्येकाला भरभरून देण्याचे काम केलें अहे आहे. तरी काही लोक कृतघ्न झालेत तर काही लोक कृतज्ञ झाले आहेत. काँग्रेस नेहमीच वाईट प्रवृत्तीच्या विरोधात उभी राहिली आहे. त्यामुळें या मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीं असा इशारा देखील विरोधकांना दिला आहे. जो पर्यंत येथील उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत काँग्रेस साठी ही जागा सुटावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
