⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी संदर्भीय पत्रातील मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व देशी / विदेशी दारुविक्रीची दुकाने (सीएल-३, एफएल-२, एफएल-बीआर-२, टिडी-१ इत्यादी) अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आदेश दिले आहेत.
कोरडे दिवस, बंदचा कालवधी पूर्ण जिल्ह्यात याप्रमाणे- दि. 18 नोव्हेंबर, 2024 मतदानाच्या अगोदरचे दिवस, सायंकाळी 5 वाजलेपासून बंद. 19 नाव्हेंबर, 2024 मतदानाच्या अगोदरचे दिवस, संपूर्ण दिवस बंद. दि. 20 नोव्हेंबर, 2024 मतदानाचा दिवस,मतदान पूर्ण होईपर्यंत बंद व दि. 23 नोव्हेंबर, 2024 मतमोजणीचा दिवस.
आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकां विरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कळविले आहे.
00000
निवडणूक काळात दि. 18,19, 20 व 23 नोव्हेंबर रोजी कोरडा दिवस…
