जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था,सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) निर्बंध घातल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी काढले आहेत.

You cannot copy content of this page